|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वकिलाचा निघृण खून

वकिलाचा निघृण खून 

प्रतिनिधी / सोलापूर

मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेले वकील राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रम्हचैतन्य नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या शरीराचे धारादार हत्याराने 6 तुकडे करुन निघृणपणे खून केल्याचे बुधवारी दुपारी उघडकीला आले. विशेष म्हणजे तालुका पोलीस ठाण्याच्या पाठभिंतीला असलेल्या पांडुरंग वस्तीत ही घटना घडली आहे. शरीराचे तुकडे पोत्यात भरुन मारेकऱयाने ती पोती देवघराच्या खोलीत ठेवून पलायन केले असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. शांत व सुस्वभावी वकिलाचा खून कोणत्या कारणासाठी केला गेला असावा याबाबत मात्र न्यायालय परिसर तसेच रुग्णालयात चर्चा सुरु होती.

सोलापूर जिल्हा न्यायालयात ऍड. कांबळे हे सुमारे 15 वर्षापासून वकिलीचा व्यवसाय करीत होते. शनिवार 8 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पक्षकाराला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या पत्नी अस्मिता यांनी दुपारी जेवणासाठी फोन केला. त्यावेळी त्यांनी काम संपवून येणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर वाट पाहून त्यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मात्र कन्नड भाषेतून फोन बंद असल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर त्यांनी घरातील इतर लोकांना याची माहिती दिली. घरातील सर्व लोक ऍड. कांबळे यांची वाट पाहत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते परतले नसल्याने घरातील लोकांनी त्यांच्याशी संबंधितांकडे चौकशी केली. मात्र कुठेच माहिती मिळाली नाही. यामुळे 9 जूनच्या पहाटे घरातील लोकांनी कोर्ट परिसर तसेच एसटीस्टॅन्ड आदी भागात त्यांचा शोध घेतला. त्यानंतर सकाळी विजापूर नाका पोलीस ठाण्यात ऍड. कांबळे हे बेपत्ता झाल्याची तक्रार नेंदविली.

दरम्यान, तीन दिवसांपासून बेपत्ता ऍड. कांबळे यांच्या काळजीने चिंतातूर झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे मोठे काम देतो असे सांगणाऱया संजय उर्फ बंटी खरटमल (रा. पांडुरंग वस्ती, तालुका पोलीस ठाण्याच्या rमागे, सोलापूर) वर संशय व्यक्त केला. त्यानुसार विजापूर नाका व सदर बझार पोलिसांच्या मदतीने खरटमलच्या घराची बुधवारी सकाळी तपासणी केली. त्यावेळी त्याचे घर बंद होते. परंतु आतून मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी येत होती. यामुळे पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली असता, काळ्या रंगाच्या दोन पोत्यांत काहीतरी असल्याचे दूसन आले. पोलिसांनी पोती उघडून पाहिली तेव्हा आतमध्ये मानवी शरीराचे तुकडे करुन भरुन ठेवल्याचे दिसून आले.

यानंतर पोलिसांनी शरीराच्या तुकडय़ांनी भरलेली पोती शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविली. दरम्यान नातेवाईकांनी पोत्यातील शरीराचे तुकडे ऍड. कांबळे यांचेच असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ऍड. कांबळे यांचे भाऊ मुकेश यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित आरोपी संजय उर्फ बंटी खरटमल विरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात खून तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करयाचे काम रात्री उ†िशरापर्यंत सुरु होते. ऍड. कांबळे यांच्या पश्चात आई पार्वती वडील श्रीमंत, पत्नी अस्मिता, मुलगी आरोही व 8 महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. 

कोण हा बंटी खरटमल

काही वर्षापूर्वी कुमठा नाका परिसरातील एका गटात कायम सक्रिय असणारा बंटी हा आर्केस्ट्राबारमध्येही रखवालदार म्हणून काम करीत होता असे समजते. क्रिमिनल म्हणून ओळख असलेला बंटी हा हल्ली शहरातील एका नावाजलेल्या रुग्णालयात रखवालदार म्हणून काम करत आहे. त्याची आणि ऍड. कांबळे यांची ओळख जुनी असल्याचे सांगितले जात आहे. 

रुग्णालयात वकिलांची गर्दी

बेपत्ता वकिल कांबळे यांचा शोध वरिष्ठ अधिकाऱयामार्फत करण्यात यावा अशी मागणी बार असोसिएशनच्या वतीने मंगळवारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी ऍड. कांबळे यांचा खून झाल्याची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात वकिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये ऍड. मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत, बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर, ऍड. रजाक शेख, बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱयांसह मोठय़ा प्रमाणात वकिलांनी गर्दी केली होती.

Related posts: