|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यातील पहिला बायोडिझेस्टर टॉयलेटचा नेरूल चर्चमध्ये शुभारंभ

राज्यातील पहिला बायोडिझेस्टर टॉयलेटचा नेरूल चर्चमध्ये शुभारंभ 

प्रतिनिधी/ म्हापसा

ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर यांच्या प्रयत्नाने व पुणे विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सहकार्याने राज्यातील पहिला बायोडिझेस्टर (BIO DIGESTER)टॉयलेट चे उद्घाटन साळगाव मतदार संघातील नेरूल अवर लेडी ऑफ रेमेडीस चर्चमध्ये करण्यात आले.

राज्य सरकार गेली चार-पाच वर्षापासून बायोडायझेस्टर टॉयलेट बसविण्यासाठी आपण प्रयत्नात आहे मात्र त्याना अद्याप यश आले नाही. ग्रामीण विकास योजनेंतर्गत राज्यात बायोडायझेस्टर टॉयलेट घरोघरी बसविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री साळगावकर यांनी पत्रकारांशी बोलातना दिली. घरोघरी निरीक्षण करून राज्यात हे टॉयलेट बसविता येईल. टॉयलेटमध्ये बॅक्टेरीया घातल्यावर पाण्याची टाकी निदान 10 वर्षे न सुकता शौचालयाच्या टाकीमध्ये बॅक्टेरीयाद्वारे पाणीच राहते अशी माहिती मंत्र्यांनी दिली. या अत्याधुनिक पद्धतीच्या टॉयलेटचे राज्यात प्रथमच चर्च कोमुनिटीसाठी नेरूल येथे वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार बायोडायझेस्टर टॉयलेट करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून प्रयत्नात आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा मुक्त भारतद्वारे उपक्रम हाती घेण्याचा सरकारचा मनोदय आहे मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आपण खासगीरित्या नेरूल येथे चर्चमध्ये हा बायोडायझेस्टर टॉयलेट बसविला असून त्याचे रितसर उद्घाटन केलेले आहे. असे साळगावकर यांनी सांगितले. ग्रामीण विकास योजनेंतर्गत या योजनेची कामे आरडीए अंतर्गत आपण राज्यात सुरू करणार असून प्रथम घरोघरी हे टॉयलेट बसविणे गरजेचे आहे अशी माहिती मंत्री साळगावकर यांनी यावेळी दिली. या टॉयलेटची किम्मत कमी करून सर्वसामान्य जनतेला झेपेल अशी सोय करण्यात येणार असून यासाठी सबसीडीही देण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे सायन्स ऍण्ड टॅक्नोलोजी अंतर्गत ही योजना राज्यात आणण्यात येणार असल्याचे मंत्री म्हणाले. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणी करण्यात येईल असे मंत्री म्हणाले.

अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा हा उपक्रम असून राज्यात त्याचा फायदा प्रत्येक घरोघरी होईल. टाकीमध्ये जी घाण असते ती बॅक्टेरीया टाकल्यावर त्याचे आतमध्ये पाणी होते. या तंत्रज्ञानद्वारे एकदा बॅक्टेरीया घातल्यावर किमान 10 वर्षे टाकी मधील घाण पाणी होऊन ती जमिनीत मिसळते असे मंत्री साळगावकर यांनी सांगितले. नेरूल चर्चला यंदा 450 वर्षे पूर्ण होत असून हा टॉयलेट येथे पुरस्कृत करण्यात आला आहे. या चर्चचे अद्याप भरपूर काम पूर्ण करणे बाकी आहे. गोवा पर्यटन खात्यांतर्गत या चर्चचे सुशोभिकरण काम हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्री जयेश साळगावकर म्हणाले. असे शौचालय महिलांसाठी अत्यावश्यक असून कोमुनिटी ठिकाणी हे बसविण्यात भर देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी नेरूल सरपंच पियादाद आल्मेदा, फादर बोलमेक्स परेरा, उपसरपंच संदीप होबळे, पंच अविनाश बाणावलीकर, रेश्मा कळंगुटकर, ऍन्थोनी डिसोजा, पुणे विज्ञान आणि तंत्रज्ञानचे अधिकारी डॉ. जगदाळे, डॉ. पाटील, डॉ. परंदारे, प्रशांत आमोणकर, डॉ. तेंडगे आदी उपस्थित होते.