|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा राज्यपालपदी सुषमा की सुमित्रा?

गोवा राज्यपालपदी सुषमा की सुमित्रा? 

 

विशेष प्रतिनिधी/ पणजी

गोव्याच्या राज्यपालपदी आता कोणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे. विद्यमान राज्यपाल मृदूला सिन्हा यांची मुदत 30 ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. 

देशभरातील सुमारे एक डझन राज्यातील राज्यपालांची मुदत पुढील दोन महिन्यात संपुष्टात येत आहे. राज्यपालांची नियुक्ती ही प्रामुख्याने 5 वर्षांसाठी असते. त्यामुळे मोदी सरकारने 5 वर्षापूर्वी नियुक्त केलेल्या राज्यपालांची मुदत आता संपुष्टात येत असल्याने गोव्याला देखील नवा राज्यपाल मिळणार आहे.

महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याचे नावही चर्चेत असून माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज किंवा लोकसभेच्या मावळत्या सभापती सुमित्रा महाजन यांचेही नाव सध्या गोव्याच्या राज्यपालपदासाठी चर्चेत घेतले जात आहे.