|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरासह ग्रामीण भागात मान्सूनचे आगमन

शहरासह ग्रामीण भागात मान्सूनचे आगमन 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरासह ग्रामीण भागामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. सकाळपासूनच ठिकठिकाणी पावसाच्या हलक्मया सरी कोसळल्या. मात्र, पावसाला म्हणावा तसा जोर नसल्याचे दिसत होते. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि वाऱयामध्येही वाढ झाली होती. त्यामुळे दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाला जोर नसल्याचे दिसून येत होते.

यावषी मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याचे दिसून येत आहे. पण त्याला जोर नसल्यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण शेतकऱयांनी काही भागात भात पेरणी केली आहे. काही भागात अजून पेरणी झाली नाही. त्यामुळे दमदार पावसाची गरज आहे. जून महिना अर्ध्यावर आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्यामुळे पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे.

आता पावसाला सुरुवात झाल्याने येत्या काही दिवसात दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घरातून बाहेर पडताना रेनकोट आणि छत्र्या घेऊनच सर्वजण बाहेर पडत होते. बऱयाच दिवसांपासून ग्राहकांची वाट बघणाऱया छत्री आणि रेनकोट विपेत्यांना  पाऊस सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. ग्राहक छत्री आणि रेनकोट खरेदीसाठी येत होते. त्यामुळे थोडेसे समाधान व्यापाऱयांतून व्यक्त होत आहे.

ढगाळ वातावरण आणि पावसामुळे काहीसा हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे फेरी विपेते आणि बैठय़ा व्यापाऱयांनी पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी प्लास्टिक आणि मोठय़ा छत्र्यांचा वापर केला होता. पावसाला सुरुवात झाल्यामुळे बी-बियाणे आणि खते विक्री करणाऱया व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.