|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पी.के.क्वॉर्टर्सच्या धोकादायक इमारती हटविण्यास प्रारंभ

पी.के.क्वॉर्टर्सच्या धोकादायक इमारती हटविण्यास प्रारंभ 

प्रतिनिधी/ बेळगाव

निवृत्त कर्मचाऱयांचे स्थलांतर करण्यासाठी आनंदवाडी येथील बहुमजली पी. के. क्वॉर्टर्समध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱयांनी जुन्या इमारतींमधून स्थलांतर केले आहे. यामुळे पी. के. क्वॉर्टर्सच्या धोकादायक इमारती पाडण्यास महापालिका प्रशासनाने प्रारंभ केला आहे. याची पाहणी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी बुधवारी केली.

पाडण्यात येणाऱया व स्वच्छता कर्मचाऱयांचे स्थलांतर करण्यात आलेल्या पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारतींची पाहणी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी बुधवारी सकाळी अधिकाऱयांसमवेत केली. मोठय़ा पावसाला प्रारंभ होण्यापूर्वी धोकादायक इमारती हटविण्याचे काम पूर्ण करण्याची सूचना शहर अभियंत्यांना शशीधर कुरेर यांनी केली.

पी. के. क्वॉर्टर्स रिकामी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने घिसाडघाई चालविली होती. निवृत्त कर्मचाऱयांना राहण्यासाठी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे पी. के. क्वॉर्टर्स रिकामी करण्यास विरोध दर्शवून विविध संघटनांनी आंदोलन छेडले होते. याबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठका झाल्या. पण निवृत्त कर्मचाऱयांना राहण्याची सोय व कायमस्वरूपी घरे देण्याच्या मागणीवर स्वच्छता कर्मचारी संघटना ठाम होती. मात्र, आनंदवाडी येथे उभारण्यात आलेल्या बहुमजली पी. के. क्वॉर्टर्सचा वापर होत नसल्याने त्या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱयांचे स्थलांतर करण्याचा निर्णय झाला होता. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विशाल आर. यांच्या आश्वासनानंतर पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारती रिकामी करण्याची तयारी दर्शविली होती. पण इमारतीमध्ये पाणी, शौचालय, खिडक्मया व दरवाजांची दुरवस्था झाल्याने स्थलांतर करण्यास स्वच्छता कर्मचाऱयांनी नकार दिला होता. नागरी सुविधांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले होते. यामुळे स्वच्छता कर्मचाऱयांनी स्थलांतर केले. त्यामुळे पी. के. क्वॉर्टर्सच्या धोकादायक इमारती पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रिकामी झालेल्या इमारतींचे दरवाजे व खिडक्मया काढण्याचे काम सुरू होते. मात्र, मध्यंतरी सदर काम रखडले होते. पण बुधवारपासून इमारती हटविण्याच्या कामास गती आली आहे. रिकामी क्वॉर्टर्स पाडण्यास प्रारंभ झाला आहे.