|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोवावेस येथे वाहतूक केंडीने वाहन चालक हैराण

गोवावेस येथे वाहतूक केंडीने वाहन चालक हैराण 

बेळगाव / प्रतिनिधी

रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी दुपारी गोवावेस येथे वाहतुकीची कोंडी होऊन तब्बल अर्धा तास वाहने अडकली होती. त्यामुळे गोवावेस येथे एका वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शहरातील वाहतूक कोंडीत दररोज वाढ होत आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये तर वाहतूक कोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. गोवावेस येथे चार रस्ते एकाच ठिकाणी येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. प्रत्येक वाहनचालक आपली गाडी पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे या वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.

काँगेस रोडचा फटका गोवावेसला

सध्या काँग्रेस रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. एकेरी मार्गाने ही वाहतूक सुरू आहे. यामुळे बसवेश्वर उड्डाण पुलावरून गोवावेसमार्गे आरपीडी येथे अवजड वाहनेही जात आहेत. या अवजड वाहनांचा फटका इतर वाहनचालकांना बसत असून, वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.