|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अखेर येळ्ळूर आणि कणबर्गी शेतकऱयांच्या नावे नोटीस

अखेर येळ्ळूर आणि कणबर्गी शेतकऱयांच्या नावे नोटीस 

प्रतिनिधी / बेळगाव

अखेर रिंगरोडसाठी येळ्ळूर आणि कणबर्गी येथील शेतकऱयांच्या नावे नोटिफिकेशन काढण्यात आले असून शेतकऱयांच्या जमिनी पुन्हा हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू होणार आहे. आतापर्यंत तालुक्मयातील 31 गावांतील शेतकऱयांच्या नावे नोटिफिकेशन काढण्यात आले होते. आता उर्वरित दोन गावांचेही नोटिफिकेशन करण्यात आले आहे. यामुळे येळ्ळूर आणि कणबर्गीच्या शेतकऱयांना 21 दिवसांच्या आत आपल्या तक्रारी नोंदवाव्या लागणार आहेत.

हलगा-मच्छे बायपासनंतर रिंगरोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची घाई गडबड चालली आहे. प्रांताधिकारी ही सर्व जमीन कब्जात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे सोपविण्याच्या तयारीत आहेत. रिंगरोडसाठीही दडपशाही होण्याची भीती व्यक्त होत आहे. रिंगरोडमध्ये तब्बल बाराशे एकर जमीन जाणार आहे. त्यामुळे तालुक्मयातील शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

यापूर्वी रिंगरोडविरोधात शेतकऱयांनी आपल्या हरकती दाखल केल्या आहेत. त्यावर अजून सुनावणी झाली नाही. प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर यांनी अद्याप यावर सुनावणी दिली नाही. त्यामुळे शेतकऱयांचे हे काम प्रलंबित आहे. आता येळ्ळूर आणि कणबर्गीच्या शेतकऱयांनी हरकती नेंदल्यानंतरच सुनावणी होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. रिंगरोडविरोधात शेतकऱयांनी एकजुटीने लढाई लढण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण यापूर्वी शेतकऱयांनी हलगा-मच्छे बायपास लढाई लढली तरीही शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याविरोधात एकजुटीने लढाई लढणे गरजेचे आहे.

हलगा-मच्छे बायपासनंतर रिंगरोडसाठी जमिनी हिसकावून घेतल्या तर तालुक्मयातील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. हलगा येथील सांडपाणी प्रकल्पासाठी जमीन हिसकावून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तेव्हा शेतकऱयांनी एकजुटीने न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरील लढाई लढणे गरजेचे आहे.