|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांच्याकडून नरेंद्र मोदींचे नारे

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांच्याकडून नरेंद्र मोदींचे नारे 

 ‘मोदी है तो मुमकीन है’, माईक जून अखेरीस भारताच्या दौऱयावर, मोदींना भेटणार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

‘मोदी है तो मुमकीन है’ ही भाजपने लोकसभा निवडणुकीत वापरलेली टॅग लाईन पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी ही टॅग लाईन बोलून दाखवली आहे. माईक पॉम्पियो या महिन्याअखेर भारताच्या दौऱयावर येणार आहेत. माईक यांनी ’मोदी है तो मुमकीन है’चे नारे देत आपण भारत दौऱयावर येण्या उत्सुक असल्याचे म्हणले आहे. माईक हे बुधवारी यूएस-इंडिया बिझनेस काऊंसिलच्या इंडिया आयडियाज संमेलनात बोलत होते. भाजप निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी है तो मुमकीन है असे नारे दिले होते. तर मोदी मेक्स इट पॉसिबल, असे माईक यांनी म्हटले आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी घट्ट होत असल्याचे दिसत आहे.  

माईक पॉम्पियो जून महिन्याच्या अखेरिस नवी दिल्लीत येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटतील, माईक पॉम्पियो 24 ते 30 जूनपर्यंत भारत, श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत.