|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » खुशखबर… भारत विरूद्ध न्यूझीलंड लढतीत पावसाची शक्यता 40 टक्के कमी झाली

खुशखबर… भारत विरूद्ध न्यूझीलंड लढतीत पावसाची शक्यता 40 टक्के कमी झाली 

ऑनलाईन टीम / लंडन :

   क्रिकेटच्या महासंग्रामात आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. परंतु पावसामुळे हा सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्हाच होते. पण, नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार पावसाने आपला मूड बदलला असून, सामन्याच्यावेळी पाऊस पडण्याची शक्मयता 40 टक्क्मयांनी कमी झाली आहे. या अंदाजामुळे सर्वाच क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येणार आहे. नॉटिंगहॅम येथील टेंट ब्रिज येथे आज वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा गेले दोन दिवस रंगत होत्या. या आधी वर्ल्डकपचे तीन सामने पावसामुळे रद्द करण्यात आल्याने भारतीय चाहत्यांच्या मनात एक रूखरूख लागून राहिली होती. परंतु आजच्या हवामानाचा अंदाज घेतल्यास पाऊसच हावी होईल, असे चित्र नाही. पावसाने आपला मूड बदलला आहे असून, सामन्याच्यावेळी पाऊस पडण्याची शक्मयता 40 टक्क्मयांनी कमी झाली आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड संघांतील सामन्याचा आनंद सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार तरी लुटता येईल.