|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » `वायू’ चक्रीवादळाने आपली दिशा बदलली

`वायू’ चक्रीवादळाने आपली दिशा बदलली 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून ताशी 135 ते 145 कमीच्या तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱया हे चक्रिवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर न धडकता, समुद्राच्या दिशेने वळले असल्याची दिलासा देणारी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने गुजरात सरकारने देखील संपूर्ण खबरदारी घेतली असून, सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पोरबंदर आणि द्वारका किनाऱयापट्टीच्या भागातून माघारी वळणार आहे. चक्रीवादळ माघारी फिरताना गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा परिणाम जाणवणार असून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्मयता आहे. गुजरात सरकारने आतापर्यंत 3.1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे 500 गावांतील लोकांची 200 सुरक्षित ठिकाणांवर राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच राष्ट्रीय संकट निवारण दलाच्या (एनडीआरएफ) 52 तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत.