|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सूनपूर्व पावसाची हजेरी 

प्रतिनिधी/ सांगली

शहरासह जिल्हय़ातील काही भागात गुरूवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.  शहरामध्ये सायंकाळी जोरदार सरी कोसळल्या यामुळे सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाण साचून राहिले. या पावसाने जिल्हय़ातील शेतकऱयांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या मोठया पावसच्या प्रतीक्षेत बळीराजा आहेत.

शहरासह जिल्हय़ातील काही भागात बुधवारी आणि गुरूवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दहा ते 15 मिनिटे पावसाच्या हल्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण  झाला. मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीने वातावरण पावसाळी झाली मात्र मान्सून अध्याप सक्रीय झाला नसल्याने चिंतेचे ढग गडद होत आहेत. एका बाजुला जुन महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असताना दुसाऱया बाजूला अध्याप मान्सून लांबत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असताना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱयांनी मशागतीला सुरूवात केली आहे. याशिवाय बी-बियाणांची खरेदीही सुरू केली आहे

सांगली शहर परिसरामध्येही दुपारी आणि सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसाने शहरातील अनेक उपनगरातील सखल भागात काहीवेळ पावसाचे पाणी साचून राहिले. मोठा पाऊस झाला नसला तरी यामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारक आणि नागरिकांना चांगलीच करसत करावी लागली.