|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोमॅकोच्या ‘रुग्ण अन्न सेवेचे’ आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गोमॅकोच्या ‘रुग्ण अन्न सेवेचे’ आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

प्रतिनिधी/ पणजी

 बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे देशातील पहिले हॉस्पीटल आहे जिथे ‘सोडेक्सो’ या आंतराष्ट्रीय दर्जाच्या कॅटरिंग सर्व्हीसचे जेवण दिले जणार आहे. रुग्णांना चांगले पोषक असा आहार मिळाला तर रुग्ण लवकर बरा होतो, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

 बांबोळी येथील गॉमेकॉच्या नवीन ‘रुग्ण अन्न सेवेच’ उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अनेक वर्षे गोमॅकामध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे संपुर्ण गोमकॉचे नाव सोशल मिडयावर गहाण केले जात होते. ‘सोडेक्सो’ ही कंपनी जगभर प्रसिद्ध आहे या कंपनीच्या कॅटरिंग सर्व्हीस मार्फत या हॉस्पीटल मधील रुग्णांना दोन्ही वेळचे जेवण तसेच सकाळी सायं. नाश्ता पुरविला जाणार आहे. आधुनिक यंत्रे तसेच सुशिक्षित कामगार वर्ग हा या कंपनीमध्ये आहे. तसेच पोषक व हेल्थी जेवण देण्यास ‘सोडेक्सो’ कंपनी प्रसिद्ध आहे.

 रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवेप्रमाणे चांगले पोषक अन्न देणे हे सरकारचे प्रथम धोरण आहे. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी मान्य करुन ही सेवा सुरु करायला परवानगी दिली होती. त्यांच्या पुढाकाराने हे झाले आहे. तसेच आताचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचेही या सेवेला प्राधान्य मिळाले आहे. दिवसाला सुमारे दिड हजार जेवण प्लेट हॉस्पीलमध्ये रुग्णांना द्यावे लागतात. तसेच या हॉस्पीटलमध्ये येणाऱया नातेवाईकांना गोमॅकाच्या कॅन्टीगमध्ये कमी पैशात चांगल्या दर्जाचे पदार्थ मिळणार आहे, असेही यावेळी आरोग्य मंत्री राणे म्हणाले.

 या सवेसाठी आरोग्य खाते वर्षाला सुमारे 16 कोटी रुपये खर्च करणार आहे. गोव्यातील लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी सरकार विविध उपक्रम राबवित आहे. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल पूर्ण होणार आहे. या आत्याधुनिक हॉस्पीटलमध्ये गोव्यातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहे. एकंदर हे सरकार आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. मुख्यमंत्र्यांचा चांगला पाठींबा ं मिळत आहे. रुग्णांना चांगली सेवा देणे हेच सरकारचे प्रथम प्राधान्य आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

 यावेळी आरोग्य मंत्र्यांनी संपूर्ण कँटीगची पाहणी केली स्वयंपाकघरातील मशिनरीची पाहणी केली तसेच काही रुग्णांना स्वःता त्यांनी हे जेवण दिले. त्याचप्रमाणे आरोग्य ंमंत्र्यांनी स्वःता डॉक्टर व पत्रकारांसोबत या जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी गोमॅकोचे अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

Related posts: