|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले

नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील नायर रुग्णालयातून चोरीला गेलेल्या पाच दिवसांच्या बाळाचा शोध घेण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

हझेल डोनाल्ड (37) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची कोरियाची असून नालासोपारा परिसरात राहत आहे. बाळाची आई शीतल साळवी यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून हे बाळ चोरले होते. सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाल्याने पोलिसांना आरोपी महिलेचा शोध घेणे सोपे झाले. बाळाला चोरणारी महिला आरोपी गुरुवारी संध्याकाळी बाळाला घेऊन सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. मात्र, सुरक्षारक्षकांना महिलेबाबत संशय आल्याने महिलेचे बिंग फुटले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.