|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आंध्रला विशेष दर्जा देण्याची पुन्हा मागणी

आंध्रला विशेष दर्जा देण्याची पुन्हा मागणी 

  • नवी दिल्ली / वृत्तसंस्था
  • आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे मन वळवावे, असा आग्रह त्या राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना केला आहे. आज शनिवारी येथे नीती आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीत आपण विशेष राज्याच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असे प्रतिपादन रेड्डी यांनी केले.
  • त्यांनी शुक्रवारी अमित शहा यांची भेट घेतली. विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसह दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांना आंध्र प्रदेशची परिस्थिती माहीत असून राज्याला केंद्राच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करत असताना विशेष राज्याच्या दर्जाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काँगेस किंवा भाजप या दोन्ही सरकारांनी ते पूर्ण केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी आता लक्ष घालून राज्याची अडचण दूर करावी, असे आपण अमित शहा यांना आवाहन केल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. आंध्रात नुकतेच सत्तांतर झाले असून आता रेड्डी यांचे सरकार स्थानापन्न झाले आहे.