|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सामाजिक कामात राजकारणकेले नाही : उदयनराजे

सामाजिक कामात राजकारणकेले नाही : उदयनराजे 

प्रतिनिधी/ तुळजापूर

मुख्यमंत्री पद हे माझ्यासाठी गौण असून, मी माझ्या आयुष्यात राजकारण करत असताना सामाजिक कार्याला महत्व दिले आहे. मी कधीही राजकारण केले नाही,जर राजकारण केले असते तर निम्म्याहून अधिक राजकारणी आज दिसले पण नसते,त्यामुळे राजकारण करत असताना समाजकारणाला महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन खा.उदयनराजे भोसले यांनी तुळजापूर येथे दर्शनासाठी आले असता केले. खा.उदयनराजे भोसले तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते, दर्शनानंतर त्यांनी मंदिर कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. 

भोसले म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रातील जनता मोठय़ा दुष्काळाला सामोरी गेली. जून महिना चालू असला तरी अजून बळीराजाला पावसाची आस आहे. संकटाच्या  गर्तेत अडकलेल्या शेतकऱयांना बळ देण्यासाठी तुळजाभवानीला साकडे घातले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभाव आणि त्याच्या माध्यमातून स्वराज्याची संकल्पना लोकांसमोर फक्त मांडली असती तर ती कल्पना-कल्पना राहिली असती. काही झालं नसत, स्वराज्यात समानतेचा विचार हा त्यांनी केवळ मनात जो होता, तो त्यांनी आचरणात आणला. नेमकं आज ते होताना दिसत नाही असे खेदाने सांगावसे वाटते.

मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना म्हणाले, कसले पद, ही पद किरकोळ आहेत. मुख्यमंत्री बनायच असत तर मी मागेच बनलो असतो. पदामध्ये काय आहे. माझं इशू बेस्ट सोशल वर्क असतं, नो पॉलिटिक्स जर मी राजकारण केलं असत तर निम्मे राजकारणी दिसले पण नसते. पण करायचं काय आजपर्यंत झालं ते राजकारण झालं. या राजकारणामुळे फायदा झाला संपूर्ण राजकीय तज्ञ लोकांचा आणि तोटा नागरिकांचा झाला. पदावरती बसलेल्या लोकांना प्रश्न विचारा किती वर्षे झाले लोकशाही स्थापून 70 वर्षात काय झालं आणि काय झालं नाही. राजकारण करण्यापेक्षा सामाजिक दृष्टीकोण समोर ठेवून त्या हिशोबाने वाटचाल करणे गरजेचे आहे. लोक या लोकांना बसू देणार नाहीत, बसू देऊ नये अस माझं लोकांना आव्हान आहे.

कॉम्प्युटर हॅक होऊ शकते. ईव्हीएम कोणी बनविले त्याला ती त्यातील हॅकिंग बाबतची तांत्रिक माहिती असणार, मग तो स्वतः च्या स्वार्थासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करू शकतो. ईव्हीएम मशीन आणल्याने लोकांना आळशी बनविले आहे. इव्हीएम मशिनवर बटन दाबा त्यातुन चिट्टी पडणार यावरती खर्च करण्यापेक्षा पूर्वीचाच बॅलेट पेपर बरा होता. ईव्हीएमच  ’टिक’दाबल की टॅग कोठे जाते हेच कळत नाही. ईव्हीएम मशीनमुळे मतदान जेवढं झालं तेवढ मतमोजणी वेळी दाखवत नाही.

ईव्हीएम मशीनचा वापर हा टोंझानिया, युगंडा, इंडिया सारख्या देशात केला जातो. रशिया,अमेरिका ही किरकोळ देश आहेत का, येथे बॅलेट पेपर वर निवडणूका होतात. त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही जोडा ईव्हीएम फोडा असा नारा दिला पाहिजे. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांनी देवीची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.  यावेळी दिग्विजय पाटील, अतुल मलबा सह आदी उपस्थित होते.