|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खंडाळयात पुन्हा कॉंग्रेसची बाजी: राष्ट्रवादी पराभूत

खंडाळयात पुन्हा कॉंग्रेसची बाजी: राष्ट्रवादी पराभूत 

प्रतिनिधी/ खंडाळा

शह-काटशहाच्या राजकाणात नगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार या विषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र नगराध्यक्षपदी प्रल्हाद खंडागळे, उपनगराध्यक्ष म्हणून शोभा गाढवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान कॉंग्रेसच्यावतीने आठ विरूध्द नऊ मते घेत बहुमान मिळविणारे, नुतन नगराध्यक्ष खंडागळे यांनी शहराच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे मत व्यक्त केले.

 अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 9  नगरसेवक, राष्ट्रीय काँग्रेसचे 7 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादीने अपक्ष नगरसेवकास सोबत घेत आमदार मकरंद पाटील यांनी आपली सत्ता स्थापन केली. दरम्यान नगराध्यक्षा लताताई नरुटे अणि उपनगराध्यक्ष दत्तात्रय गाढवे यांच्या पदाचा कालावधी संपल्याने निवड प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील रिक्त जागेसाठी असल्यामुळे पुन्हा लताताई नरुटे यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष दया ऊर्फ दयानंद खंडागळे, राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान उपनगराध्यक्ष दत्तात्रय गाढवे, नगरसेवक प्रल्हाद खंडागळे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यानंतर नाराज झालेल्या नरुटे यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात बंड पुकारत काँग्रेसच्या गोटात सामिल झाल्या. त्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. माघारीच्या दिवशी विद्यमान उपनगराध्यक्ष दतात्रय गाढवे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे प्रभाग क्र. एकमधील राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष दया ऊर्फ दयानंद खंडागळे, आणि प्रभाग क्र दहामधील राष्ट्रीय कॉंग्रेसचे नगरसेवक प्रल्हाद खंडागळे आमने-सामने आल्यामुळे  दोघांमध्ये चुरस वाढली हेती. तर आमदार पाटील यांना जाहीर विरोध करणार असल्याचे सांगत लताताई नरुटे यांनी कॉंग्रेसला साथ दिली. तसेच शोभा गाढवे यांनी साथ देत काँग्रेसला दोन नगरसेवक मिळाळ्यामुळे पारडे जड झाले. त्यामुळे डाव-प्रति डाव टाकत अखेर काँग्रेसने बाजी मारल्याने नगराध्यक्ष पदावर प्रल्हाद खंडागळे यांची वर्णी लागली.

      दरम्यान उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्यावतीने शोभा गाढवे यांनी तर राष्ट्रवादीकडून उज्वला सकपाळ यांनी मुख्याधिकारी अभिजित परदेशी यांच्याकडे नामर्नि देशन पत्र दाखल केले. ते नामर्निदेशन पत्र वैध ठरले. त्यानंतर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये शोभा गाढवे यांना नऊ मते मिळाल्याने उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीत हात उंचावून नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे यांना नऊ , तर उपाध्यक्ष शोभा गाढवे यांना नऊ मते मिळाल्यामुळे विजयी झाल्याचे प्रांत अधिकारी संगिता चौगुले यांनी जाहीर केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.  

       खंडागळे, गाढवे यांची वर्णी !

नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात प्रांत अधिकारी संगिता चौगुले – राजापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने पदाधिकारी निवडी विशेष सभा बोलविण्यात आली होती. नगराध्यक्ष पदी प्रल्हाद खंडागळे, तर उपनगराध्यक्ष म्हणून शोभा गाढवे यांची निवड केल्याचे घोषित करण्यात आले. तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.  

     

    भाजपात जाण्याचे संकेत ……..

  यापूर्वी गावातले निर्णय गावात होत . मात्र मधल्या काळात बाहेरुन निर्णय लादण्याची प्रथा सुरू झाली . खंडाळकर निर्णय घेण्यास सक्षम आहेत . गावच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन आपण आपले निर्णय घेऊ . यात सर्व नागरीकांनी सहकार्य करावे . युती सरकारच्या माध्यमातुन गावच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहात .आठवडाभरातच गावच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे अनिरूदध गाढवे यांनी सांगत भाजपा प्रवेशाचे संकेत दिले .