|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोमेकॉच्या डॉक्टराकडून पं. बंगाल घटनेचा निषेध

गोमेकॉच्या डॉक्टराकडून पं. बंगाल घटनेचा निषेध 

प्रतिनिधी/ पणजी

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरानी बांबोळी गोमेकॉपरीसरात आंदोलन केले. यावेळी गुन्हेगाराना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. आमची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोचविण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यापाशी केली.

या मोर्चामध्ये चारशेपेक्षा जास्त डॉक्टरांचा समावेश होता. डॉक्टरानी मोर्चा काढला असला तरी यावेळी गोमेकॉतील आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू होती. ज्येष्ठ डॉक्टर यावेळी सेवेसाठी उपस्थित होते. कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरावरील हल्ल्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी डॉक्टरानी सांगितले. या हल्ल्यात दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले. कलकत्ता सरकारने गुन्हेगाराना अटक केली नाही. त्याचबरोबर हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पश्चिम बंगालमधील डॉक्टर केवळ संरक्षण मागत आहेत. त्याचबरोबर गुन्हेगाराना अटक क्हावी अशी मागणी करीत आहेत. गोवा निवासी डॉक्टरनी कलकत्ता डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी काल हा मोर्चा काढण्यात आला. देशभरातील डॉक्टर आज कलकत्त डॉक्टरांच्या पाठीशी आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यापाशी मागणी केली आहे. केंद्र सरकरकडे गोवा डॉक्टरांची मागणी पोचवावी व गुन्हेगाराविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी डॉक्टरांनी केली.

या मोर्चामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेवेवर परीणाम झाला नसल्याचे गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. या संदर्भात अगोदर बैठक घेऊन नियोजन केले होते. डॉक्टरना बोलावून घेऊन सेवेत नियुक्त केले होते. सर्व ओपीडी, आपत्कालीन, अतिदक्षता विभाग कार्यरत होते. त्यामुळे गोमेकॉच्या सेवेवर परीणाम झाला नसल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

मोर्चावेळी पश्चिम बंगालमधील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. ज्या पद्धतीने डॉक्टरावर हल्ला करण्यात आला ते योग्य नव्हे. उद्रेकाने काहीही साध्य होत नाही एका डॉक्टवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. डॉक्टरचा जीवनाशी संघर्ष सुरू आहे. मारहाण, तोडफोड हा कोणत्याही समस्येवरील तोडगा असत नाही आपल्या क्लीनिकमध्ये बसलेल्या डॉक्टरना अशापद्धतीने मारहाण केली जाऊ शकत नाही असेही एका डॉक्टरने स्पष्ट पेले.

 मणिपाल इस्पितळाचाही पाठेंबा

मणिपाल इस्पितळाच्या डॉक्टर व व्यावस्थापनानेही पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. वैद्यकीय सेवा देणाऱया डॉक्टरावरील हल्ल्याचा निषेध सर्व स्तरावरून व्हायला हवा अशी मागणी डॉ. शेखर साळकर यांनी केली.

लायन्स, रोटरीयन्स व अन्य संस्थानीही या घटनेचा निषेध करायला हवा. सर्व बिगर सरकारी संघटनानी यावेळी डॉक्टराना पाठिंबा द्यायला हवा. विविध संघटनासाठी व वैद्यकीय शिबिरामधून मोफत सेवा पुरविण्याचे काम डॉक्टर करतात. डॉक्टराना पश्चिम बंगालमध्ये झालेला हल्ला ही बाब निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले.