|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत दोन रस्त्यांवर पे पार्पिंग

पणजीत दोन रस्त्यांवर पे पार्पिंग 

प्रतिनिधी/पणजी

 पणजीतील बेशिस्त पार्किगवर नियंत्रण आणण्यासाठी काल शुक्रवारी झालेल्या पणजी महानगरपालिकेच्या बैठकीत काही प्रमुख रस्त्यांवर पे पार्किंग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचचबरोबर वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱया कॅसिनोंच्या गाडय़ांचे पार्किंग फक्त त्यांच्या पार्किंग स्लॉटमध्येच करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी सागितले.

  दोन वर्षापूर्वी पणजी शहरात काही महत्वाच्या रस्त्यांवर पे पार्किगची सुरुवात केली होती. पण कंत्राटदाराने पैसे बुडविल्याने ते पे पार्किग बंद पडले. त्यामुळे पणजीत बेशिस्त पार्किंग वाढल्याने सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे. अनेक दिवस पे पार्किगचा निर्णय पडून होता.

 आत्माराम बोरकर, अठरा जून रस्त्यावर पे पार्किंग

 या बैठकीत आत्माराम बोरकर रस्ता व 18 जून रस्ता या दोन प्रमुख रस्त्यांवर पे पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या दोन तासांना 20 रुपये तर पुढील प्रत्येक एका तासाला 10 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे कंत्राटदाराने 3 महिन्याचे आगाऊ रक्कम मनपाला द्यावी लागणार आहे. शहरात अन्य ठिकाणी लवकरच पार्किंगचा निर्णय घेतला जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

 मान्सूपूर्व कामे रखडल्याने नगरसेवक संतप्त

 मान्सून सुरु झाला तरी अजून पणजीतील प्रभागातील कामे पूर्ण झाली नसल्याने नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले. पहिल्याच पावसात पणजीत ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकांची धांदल उडाली. तसेच काही प्रभागातील गटारांची कामे अजून सुरुच आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी आणखी 30 कामगारांची भरती करुन सर्व प्रभागातील कामे लवकर पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

 मार्पेटवरुन नगरसेवक, आयुक्त, महापौरांमध्ये खडाजंगाr

 गेल्या अनेक वर्षापासून गाजत असलेल्या मार्केटच्या विषयावरुन नगरसेवक, आयुक्त व महापौरामध्ये खडाजंगी झाली. मार्केटमध्ये दुकानदारांचा भाडे करार, परवाना करार या वरुन काही प्रमाणात वाद झाला. मनपाने ठरवलेली रक्कम दुकानदारांनी मान्य करुन हा करार मान्य करावा अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी धरुन लावली. तसेच मार्केटमध्ये सर्व दुकानांची पाहणी करुन त्यांची योग्य तपासणी करण्याची मागणी केली. पुढील बैठकीत त्यांच्याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 पणजी शहरात सुलभ आंतराष्ट्रीय एजन्सीमार्फत आणखी सुमारे 300 शौचालये बांधली जाणार आहेत.  

 शहरातील 200 बेवारस वाहने हटविणार

 पणजीत बेवारस पडून असलेली वाहने आता बायंगिणी येथे स्थलांतरीत केली जाणार आहेत. पणजीत शहरात सुमारे 200 वाहने ठिकठिकाणी पडून आहेत. त्यांना कोणीच धनी नसल्याने ती अनेक वर्षे त्या जागेवर गंजत आहे. यामुळे अन्य लोकांना त्या ठिकाणी पार्किंग करायला जागा मिळत नाही. अशा गाडय़ांना आता शहराबाहेर ठेवले जाणार आहे. तीस दिवस एकाच ठिकाणी गाडी पडून राहिली तर ती बायंगिणी येथे पाठविली जाणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

स्मार्ट सिटी समितीवर महापौरांची नियुक्तीची मागणी

 स्मार्ट सिटी योजनेमध्ये मनपाचे प्रतिनिधी म्हणून महापौरांची नियुक्ती करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत पणजी शहरात काम करताना मनपाला विश्वासात घेतले जात नाही. स्मार्ट सिटीचे अधिकारी आपल्याला हवे ते निर्णय घेत असल्याने महापौरांची या समितीमध्ये नेमणूक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच अन्य विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.