|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » तरुणांनी नोकऱयांच्या मागे लागण्यापेक्षा आपली प्रतिभा ओळखावी

तरुणांनी नोकऱयांच्या मागे लागण्यापेक्षा आपली प्रतिभा ओळखावी 

ऑनलाईन टीम / पुणे :

तरुणांनी केवळ नोकऱयांच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःमधील प्रतिभा ओळखली पाहिजे. तसेच कोणत्याही कामाबाबत तरुणांनी कमीपणा बगळता कामा नये, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनसे नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

राज म्हणाले, शिक्षणात मागे राहून देखील कोणी पंतप्रधान तर कोणी उद्योजक झाले आहेत. त्यामुळे पास किंवा नापास होण्याचा आयुष्याशी काही संबंध नसतो. व्यक्तीमध्ये विविध प्रकारचे गुण असतात, त्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न करावा. केवळ नोकरीच्या मागे लागू नये. तरुणांनी स्वतःमधील गुणवत्ता, कला वाया घालवू नये, त्यांनी स्वतःला सिद्ध करावे, असेही राज ठाकरे म्हणाले.

यावेळी माजी नगरसेविका रूपाली पाटील, माजी गटनेते बाबू वागस्कर आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: