|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » 30 जूनला मोदींची ‘मन की बात’

30 जूनला मोदींची ‘मन की बात’ 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरील ‘मन की बात’ हा कार्यक्रम येत्या 30 जून रोजी प्रसारित होणार आहे. मोदी सरकार-2 मधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे.

‘30 जून रोजी सकाळी 11 वाजता आपण पुन्हा एकदा भेटूया. रेडिओला धन्यवाद. 130 कोटी भारतीयांच्या भावना आणि सामूहिक सामर्थ्याची देवाण-घेवाण करूया. मला विश्वास आहे की, आपणाकडेही खूप साऱया गोष्टी शेअर करण्यासाठी असतील.’ तसेच आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवरुन केले आहे. या महिन्यातील ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी सूचना पाठवण्यासाठी 1800-11-7800 या क्रमांकावर मेसेज रेकॉर्ड करण्याचेही आवाहन मोदींनी केले आहे.

Related posts: