|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » भीमाईची चिरनिद्रा काळजाला हुरहुर लावणारी : चिन्मयी सुमीत

भीमाईची चिरनिद्रा काळजाला हुरहुर लावणारी : चिन्मयी सुमीत 

प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. त्या भूमिकेत शिरल्याशिवाय प्रेक्षकांपर्यंत ती भूमिका प्रभावी होत नाही. अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्याही बाबतीच असाच काहीसा प्रसंग घडला. ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत त्या बाबासाहेबांच्या आईची म्हणजेच भीमाई यांची भूमिका साकारत आहेत. अत्यंत प्रभावी आणि खंबीर असे हे व्यक्तीमत्व होते. बाबासाहेबांच्या लहानपणीच भीमाई यांचे आजारपणात निधन झाले. सर्वात लहान लेकरु म्हणून भिवावर त्यांचा प्रचंड जीव होता. या मालिकेच्या सेटवरही काहीसे असेच चित्र होते. आंबेडकरांच्या बालपणीची भूमिका साकारणाऱया अमफत गायकवाडने चिन्मयी आणि इतर सर्वांनाच खूप लळा लावला होता. भीमाई यांच्या निधनाच्या चित्रीकरणानंतर चिन्मयी यांनी मालिकेचाही निरोप घेतला. पण छोटा भिवा, मालिकेतल्या इतर सहकलाकारांसोबतच्या आठवणीने मात्र त्या भावूक झाल्या. या कुटुंबात यापुढे आपण नसणार या जाणीवेने त्यांची पावले जड झाली होती.

Related posts: