|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » देशभरातील डॉक्टरांचा आज 24 तासांचा संप

देशभरातील डॉक्टरांचा आज 24 तासांचा संप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरात सुरु असलेला डॉक्टरांचा संप आजही सुरु राहणार आहे. सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हा 24 तासांचा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या या संपात देशभरातील 5 लाख डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला आहे. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या संपात सहभाग न घेतल्याने एम्सच्या रुग्णसेवा सुरळीत सुरु राहणार आहे.

कोलकातामधील एनआरएस मेडिकल कॉलेज रुग्णालयात 75 वषीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यावरुन रुग्णाच्या नातेवाईकांनी गदारोळ करत डॉक्टरांना मारहाण केली. त्याच्या निषेर्धार्थ मागील मंगळवारपासून पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टर संपावर आहेत. या संपात सर्व दवाखाने, नर्सिंग होम्स आणि रुग्णालयातील रुटीन सेवा बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा देण्यात येणार आहेत. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदा बनविण्याची गरज आहे. रुग्णालयांना सुरक्षा ठिकाणांच्या यादीत समाविष्ट करुन डॉक्टरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी संपकरी डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा डॉक्टरांशी चर्चा करणार आहेत.

Related posts: