|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑलिंपिक धावपटू किर्वावर बंदी

ऑलिंपिक धावपटू किर्वावर बंदी 

वृत्तसंस्था/ पॅरीस

2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये मॅरेथॉनचे रौप्यपदक मिळविणारी केनियात जन्मलेला 35 वर्षीय धावपटू बेरेनी किर्वा उत्तेजक चांचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय एआययुतर्फे घेण्यात आला आहे.

रिओ ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या मॅरेथॉनमध्ये किर्वाने दुसऱया स्थानासह रौप्यपदक मिळविले होते. 2015 साली बिजिंगमध्ये झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत किर्वाने कास्यपदक मिळविले होते. गेल्या महिन्यात किर्वा उत्तेजक चांचणीत दोषी आढळल्याने तिच्यावर हंगामी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 7 मे 2019 पासून किर्वाच्या बंदी कालावधीला प्रारंभ होणार आहे. या निर्णयाविरूद्ध किर्वा क्रीडा लवादाकडे दाद मागू शकते.

 

Related posts: