|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » ‘या’ बँकांनी केले व्याज दर कमी

‘या’ बँकांनी केले व्याज दर कमी 

बँकांच्या निर्णयाचा ग्राहकांवर होणार परिणाम

वृत्तसंस्था / मुंबई

देशाच्या अनेक मोठय़ा खासगी आणि सरकारी बँकांनी व्याजदरांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत आयसीआयसीआय बँकेनंतर बंधन बँकेनेही आपले व्याज दर कमी केले आहेत. बंधन बँकेने गेल्या 4 वर्षातल्या छोटय़ा कर्जावर व्याज दरात एकूण 4.45 टक्के कपात केली आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेत जमा असलेल्या रकमेच्या व्याज दरावर 0.10 ते 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. ऍक्सिस बँकेकडूनही व्याज दरावर 0.15 टक्के कपात करण्यात आली आहे.

रेपो दरामध्ये कपात झाल्यामुळे आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि बंधन बँक यांनी हे मोठे पाऊल उचलले असून त्याचा परिणाम बँकांच्या ग्राहकांवर होणार आहे.

आयसीआयसीआयकडून एफडीवरील व्याज दर कमी…

बँकेने जमा केलेल्या व्याज दरांवर 0.10 पासून 0.25 टक्के कपात केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 290 दिवसांपासून 1 वर्षापर्यंत जमा केलेल्या 2 कोटी रुपयांवरच्या जमा रकमेवर बँक 6.75 टक्के व्याज देणार आहे. तर 2 वर्ष ते 3 वर्षापेक्षा कमी कालावधीवर जमा केलेल्या रकमेवर 7.30 टक्के व्याज मिळणार आहे.

Related posts: