|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » भारतीय तिरंदाजी संघाची निवड बिंद्रा करणार

भारतीय तिरंदाजी संघाची निवड बिंद्रा करणार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचा अव्वल नेमबाज अभिनव बिंद्राची विश्व तिरंदाजी फेडरेशनने आपल्या निवड समितीमध्ये स्वतंत्र सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. आता या नियुक्तीमुळे येत्या ऑगस्टमध्ये माद्रीद येथे होणाऱया विश्व युवा स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाजी संघाची निवड अभिनव बिंद्रा करणार आहे.

  भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस तसेच क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधी राजीव मेहता यांचाही या निवड समितीमध्ये समावेश आहे. विश्व तिरंदाजी फेडरेशनने अभिनव बिंद्राची स्वतंत्र सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे लेखी पत्र विश्व तिरंदाजी फेडरेशनचे सचीव टॉम डिलेन यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांना पाठविले आहे.

Related posts: