|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews » मराठवाडय़ात मान्सूनची हजेरी

मराठवाडय़ात मान्सूनची हजेरी 

ऑनलाईन टीम / पुणे :

पंधरा दिवसांपासून लांबलेल्या मान्सूनने मराठवाडय़ात हजेरी लावली आहे. काल रात्रीपासूनच मराठवाडय़ातील उस्मानाबाद, हिंगोली, बीड तसेच परभणीत काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे.

हवामान विभागाने 22 ते 25 जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱया एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात आज दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला होता. कोकणात 15 जूनला दाखल झालेला मान्सून ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि बीड परिसरात काल रात्री तीस तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. 26 जून नंतर सर्वच भागात पावसाचा खंड पडणार असल्याचे हवामान तज्ञांनी म्हटले आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोव्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

 

Related posts: