|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषकामध्ये मलिंगाचे बळींचे अर्धशतक

विश्वचषकामध्ये मलिंगाचे बळींचे अर्धशतक 

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने अनुभवाला साजेशी कामगिरी करताना इंग्लंडविरुद्ध 43 धावांत 4 बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली. या शानदार कामगिरीसह मलिंगाने विश्वचषक स्पर्धेतील आपले बळींचे अर्धशतकही पूर्ण केले आहे. अशी कामगिरी करणारा तो लंकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी लंकेच्या मुथय्या मुरलीधरनने अशी कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर 68 बळी आहेत.

 तसेच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱया खेळाडूंच्या यादीत त्याने चौथे स्थान पटकावले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा 71 बळीसह पहिल्या स्थानावर आहे.

 याशिवाय, विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी डावात 50 बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी 26 डावात केली. यानंतर, लंकेच्या मुरलीधरन व ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्राचा नंबर लागतो.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक

बळी मिळवणारे गोलंदाज –

  1. ग्लेन मॅकग्रा – 71 बळी
  2. मुथय्या मुरलीधरन – 68 बळी
  3. वसीम अक्रम – 55 बळी
  4. लसिथ मलिंगा – 51 बळी

जलद 50 बळी मिळवणारे

गोलंदाज

  1. लसिथ मलिंगा – 26 डाव
  2. ग्लेन मॅकग्रा – 30 डाव
  3. मुरलीधरन – 30 डाव
  4. वासीम अक्रम – 34 डाव.