|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » टेंभुच्या पाण्याने सिध्देवाडी तलाव भरुन द्या

टेंभुच्या पाण्याने सिध्देवाडी तलाव भरुन द्या 

 

वार्ताहर / सावळज

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील पाणी टंचाईची गंभीर समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी विधीमंडळात तालुक्यातील भीषण दुष्काळावर आवाज उटविला व दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी टेंभु उपसा सिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्यातुन सिध्देवाडी तलाव भरुन द्या अशी मागणी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांनी केली. तसेच पाणी योजनेपासुन सावळज परीसरातील वंचित गावांचा समावेश टेंभु किंवा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करावा ही मागणी लावुन धरली.

तासगाव तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे टेंभु उपसा सिंचन योजननेच्या टप्पा क्रमांक पाच मधुन टेंभुचे पाणी सिध्देवाडी तलावात सोडल्यास परीसरातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सिध्देवाडी तलाव भरुन द्यावा. तसेच तासगाव तालुक्यातील दुष्काळी पटय़ातील सावळज, डोंगरसोनी, लोकरेवाडी, व वडगाव या गावे पाणी योजनेपासुन वंचित असुन या चार गावांचा वारंवार मागणी करुन ही टेंभु योजनेत समावेश करण्यात आला नसल्याने गावातील शेतीला पाणी मिळणे अवघड झाले आहे.

या चार गावात सुमारे 22 हजार एकरांपेक्षा जास्त असुन सुमारे 1500 एकर द्राक्षपिक आहे. मात्र पाण्याअभावी द्राक्षबागा जगविणे शेतकऱयांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. टँकरने द्राक्षबागांना पाणी घालुन द्राक्षशेती जगविण्याची शेतकऱयांची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे या चार वंचित गावांचा समावेश टेंभु योजनेत समाविष्ठ करण्यात यावा तसेच सध्या टेंभु योजनेचा टप्पा क्रमांक पाच भुड पंपगृह कार्यांन्वित करण्यात आला असुन या योजनेचे पाणी सिध्देवाडी तलावात सोडल्यास पाणी टंचाईचा प्रश्न सुटून शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे. तसेच वंचित सावळज, डोंगरसोनी, लोकरेवाडी, व वडगाव या गावांचा टेंभु योजनेत समावेश केल्यास सिध्देवाडी तलावातील टेंभुचे पाणी या गावांना देण्याचे सोयीचे होणार आहे. तरी वंचित गावांचा टेंभु योजनेत समाविष्ट करुन सिध्देवाडी तलावात सोडण्याची मागणी आम. सुमनताई पाटील यांनी विधीमंडळात केली.

Related posts: