|Saturday, October 19, 2019
You are here: Home » क्रिडा » अमेरिकेचा स्वीडनवर एकतर्फी विजय

अमेरिकेचा स्वीडनवर एकतर्फी विजय 

वृत्तसंस्था/ पॅरीस

फिफाच्या विश्वकरंडक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी येथे झालेल्या फ गटातील सामन्यात विद्यमान विजेत्या अमेरिका संघाने स्वीडनचा 2-0 असा पराभव करून आपल्या गटात आघाडीचे स्थान मिळविले. अमेरिकेचा पुढील फेरीतील सामना स्पेनशी होणार आहे.

या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोल अमेरिकेच्या लिंडसे होरेनने या सामन्यात केला. सामन्याच्या तिसऱया मिनिटाला होरेनने अमेरिकेचे खाते उघडले. जोना अँडरसनने आपल्या गोलपोस्टमध्ये नजरचुकीने गोल नोंदविल्याने अमेरिकेला हा दुसरा गोल बोनसच्या रूपात मिळाला. त्यानंतर स्वीडनला शेवटपर्यंत या सामन्यात खाते उघडता आले नाही. फ गटात स्वीडन 6 गुणासह दुसऱया स्थानावर आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी स्वीडनची लढत कॅनडाशी होणार आहे. प्राथमिक फेरीमध्ये अमेरिकन महिला संघाने या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 18 गोल करण्याचा विक्रम नोंदविला आहे. 1995 साली या स्पर्धेत नॉर्वेने प्राथमिक फेरीअखेर 17 गोल नोंदविण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम अमेरिकेने मागे टाकला आहे.