|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » विश्वकप स्पर्धेत आज पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आमनेसामने

विश्वकप स्पर्धेत आज पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आमनेसामने 

ऑनलाईन टीम / लंडन :

विश्वकप स्पर्धेत आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने येणार आहेत. लॉर्ड्सवर ही लढत रंगणार आहे.

मात्र, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत येण्याची शक्यता फारच कमी आहे. पाकिस्तान संघाने मात्र, अद्याप आशा सोडलेली नाही.

दक्षिण आफ्रिका संघाला सहापैकी एकच लढत जिंकता आली आहे. चार लढतींत त्यांना पराभव पत्करावा लागला असून, एक लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे. हा संघ तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान संघाला पाच पैकी एकच लढत जिंकता आली आहे. त्यांना तीन लढतींत पराभव पत्करावा लागला असून, त्यांचीही एक लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे. तीन गुणांसह सर्फराझ अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ नवव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानमधील चाहत्यांकडून होणाऱया टीकेचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला आज दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवावा लागणार आहे.