|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाची ‘पन्नाशी’

विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाची ‘पन्नाशी’ 

शनिवारी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने अफगाणिस्तानला पराभूत करताना चौथ्या विजयाची नोंद केली. शेवटच्या षटकांपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला. या शानदार विजयासोबत टीम इंडियाने एक खास विक्रमही आपल्या नावे केला आहे. भारतीय संघाचा हा विश्वचषक स्पर्धेतील पन्नासावा विजय होता. यामुळे विश्वचषक इतिहासात 50 किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवणारा भारत केवळ तिसरा संघ ठरला आहे. याआधी विश्वचषक स्पर्धेत 50 विजयांचा टप्पा हा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने पार केला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 67 तर न्यूझीलंडने 53 विजय मिळवले आहेत.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक

विजय मिळवणारे संघ –

  1. ऑस्ट्रेलिया … 67
  2. न्यूझीलंड ….. 53
  3. भारत ……… 50
  4. इंग्लंड ……… 45
  5. विंडीज …….. 42
  6. पाकिस्तान … 41
  7. श्रीलंका ……. 37
  8. दक्षिण आफ्रिका 36
  9. बांगलादेश … 13
  10. झिम्बाब्वे 11.