|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » क्रिडा » सर्फराजवर चाहत्यांचा रोष, मॉल मध्ये काढली इज्जत

सर्फराजवर चाहत्यांचा रोष, मॉल मध्ये काढली इज्जत 

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला चाहत्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. सर्फराज ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी चाहत्यांकडून अपमानास्पद टोमणे मारले जात आहेत.

शुक्रवारी लंडनमधील एका मॉलमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या चाहत्याने सर्फराजची अशाच प्रकारे खिल्ली उडवली आहे. एका पाक चाहत्याने सर्फराजला तु डुकरासारखा जाड झाला आहेस, डाएट का करत नाहीस? असा प्रश्न विचारत व्हिडिओ केला आहे. या पाक चाहत्याने जर सर्फराजचा अपमान केला असला तरी संयम न गमावता सर्फराज तिथून निघून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल झाला असून अनेक पाक चाहत्यांकडूनही त्याची खिल्ली उडवली जात आहे.

भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर सर्फराजला सातत्याने अशा टीकेला सामोरे जावे लागत आहे. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सर्फराजला बिनडोक असे म्हणाला होता. तसेच मैदानात सर्फराज जांभई देताना दिसला होता, त्यावरुनही त्याच्यावर चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता.