|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मनुष्याला उत्तम स्वास्थ्य प्रदान करणारे आयुर्वेद शास्त्र

मनुष्याला उत्तम स्वास्थ्य प्रदान करणारे आयुर्वेद शास्त्र 

प्रतिनिधी/ पणजी

आज अधिकांश समाज उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारची उपाय योजना करताना आम्ही पाहतो. सामाजिक स्तरावर  प्रत्येक माणूस निरोगी दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी इच्छा बाळगतो. त्यासाठी जे निरोगी आहेत त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी  आपल्या महान अशा आयुर्वेदात अनेक उपचार सांगितले आहेत. आयुर्वेद शास्त्र हे भारतीय परंपरेतील ऋषीमुनींनी निर्माण केलेले मनुष्याला उत्तम स्वास्थ्य प्रदान करणारे आयुर्वेदिक शास्त्र आहे. असे उदबोधन धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

धर्मकार्य तथा आध्यात्मकि ज्ञान प्राप्तीसाठी आधारभूत मानवी शरीर स्वास्थ्य वर्धक दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी स्वामी सदानंद आरोग्यधाम या चिकित्सा केंद्राची स्थापना केली.

श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा स्वामी सदानंद आरोग्य धाम व दिनदयाळ आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, डिचोली यांच्या सहाय्याने श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर आयुर्वेद पंचकर्म शिबिर घेण्यात आले होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्य कृपा नाईक म्हणाल्या की असंतुलित आहार तथा ऋतु काळात शरीरात उद्भवणाऱया दोषांपासून मुक्त होण्या करीता, आज भारत देशात भारतीय तथा परप्रांतीय लोक या आयुर्वेद शास्त्राचा अधिकांश प्रमाणात सदृढ स्वास्थ्य पूर्ण आरोग्यासाठी उपचार घेत आहेत. पंचकर्म अनेक व्याधींवर प्रभावी चिकित्सा आहे. असे प्रतिपादन वैद्य कृपा नाईक यांनी केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ परंपरेतील सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजीं हे ब्रह्मज्ञानी आध्यात्मकि सद्गुरु त्याच बरोबर स्वत: एक वैद्यराज होते. पू. स्वामींनी त्याकाळी आध्यात्मकि ज्ञानामृता बरोबर शरीराने कष्टी पीडीत झालेल्या लोकांना आयुर्वेदिक उपचार तथा वमन, विरेचन, निरुहबस्ति, अनुवासनबस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य अश्या पंच शुध्दीकरण प्रक्रिया अर्थातच पंचकर्म चिकित्स?च्याद्वारे उत्तम स्वास्थ्य प्रदान केले. भविष्यात सर्व गोमंतकीयांना तसेच गोमंतका जवळील अन्य प्रांतांना या आयुर्वेद शास्त्राचा लाभ घडला पाहिजे. असे प्रतिपादन श्री दत्त पद्मनाभ पीठ, संचालिका ऍड. ब्राह्मीदेवीजी यांनी केले.

आरोग्य प्रेमींनी या शिबिरात मोठय़ा संख्येने सहभाग दर्शविला. शिबिराचे उद्घाटन धर्मभूषण सदगुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन करकमलाद्वारे दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.

या शुभ प्रसंगी मंचावर अ?Ÿड. ब्राह्मीदेवीजी, रोहन शिरोडकर – श्री दत्त पद्मनाभ पीठ, वैद्य कृपा नाईक, वैद्य चिन्तामणी पाटील, वैद्य रश्मीना आमोणकर, वैद्य नितीन मांजरेकर ,वैद्य दिव्या भण्डारी, वैद्य गौरेश भालकेकर, सामाजिक विभाग प्रमुख दीपक गावस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाप्रबंधक शुभक्षण नाईक यांनी केले.

Related posts: