|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये आढळले मानवी हाडांचे अवशेष

नाशिकमध्ये आढळले मानवी हाडांचे अवशेष 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिकमधील पेठ रस्त्यावर असणाऱया आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ मानवी हाडांचे अवशेष आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालय परिसरातील म्हसरूळ पोलीस ठाणे व आरटीओ कार्यालयाच्या दरम्यानच्या मोकळ्या जागेत हे अवशेष आढळले आहेत. एका ठिकाणी डोक्याची कवटी तर दुसऱया ठिकाणी पायाचे दोन भाग आढळले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याबाबतचा तपास नाशिक पोलीस करीत आहेत.

 

Related posts: