|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्वीकृत नगरसेवकांवरुन भाजपांमध्ये संदोपुसंदी

स्वीकृत नगरसेवकांवरुन भाजपांमध्ये संदोपुसंदी 

प्रतिनिधी/ सातारा

पालिकेत भाजपच्या वाटय़ाला स्वीकृत नगरसेवक आहे. भाजपाच्या कोअर कमिटीने ठरवलेल्या नियमानुसार प्रत्येक वर्ष नव्या कार्यकर्त्याला पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यायची आहे, त्यामुळे सागर पावशे यांच्या राजीनाम्यानंतर इच्छुक झालेले विकास गोसावी यांच्यावर शिक्कामोर्तब होते न होते तोपर्यंत ते का नकोत यासाठी काही माजी पदाधिकाऱयांनी आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज करुन मागणी करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सातारा शहर भाजपाच्या गोटात चांगलीच संदोपुसंदी सुरु आहे. नुकत्याच शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीतही त्यावर काहीच निर्णय झाला नाही. आता मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपामधून यापूर्वी इच्छुकांची मांदियाळी नव्हती. त्यामुळे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांचे नाव डिक्लेर करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या, परंतु त्यांना जर स्वीकृतचे नगरसेवक पद मिळाले तर अगोदरच माजी सैनिक असलेल्या विकास गोसावी यांनी नियमाला धरुन निधी नसतानाही प्रभागात एका वर्षात चांगली कामे केली तर पुढे पालिकेच्या निवडणुकीत धोक्याचे ठरु शकतात. यामुळे भाजच्याच माजी पदाधिकाऱयाने त्यांना पद मिळू नये यासाठी इच्छुकांमध्ये त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना फुल्ल चार्ज केले. आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळावे यासाठी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. तोच वाद सध्या गाजतो आहे. तसेच भाजपा सातारा शहरच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्येच ही चर्चा पुढे आली. त्यामध्ये इच्छुकांनी आपलीही नावे स्वीकृतसाठी पुढे केली गेली, त्यामुळेच शहर भाजपामध्ये चांगली संदोपुसंदी सध्या सुरु आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंत हा वाद आता पोहचला असून त्यांच्याकडून स्वीकृतसाठी आता विकास गोसावी की अन्य कोणी अशी चर्चा सुरु आहे.

Related posts: