|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांचे मंत्री- आमदार स्वच्छ आहेत का?

मुख्यमंत्र्यांचे मंत्री- आमदार स्वच्छ आहेत का? 

नोकऱयांसाठी पैसे प्रकरणी ‘गोंयचो आवाज’ ची विचारणी

प्रतिनिधी/ पणजी

नोकऱयांसाठी पैसे घेणाऱया भ्रष्टाचार करणाऱया सरकारी- अधिकारी कर्मचारी यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत इशारा देतात परंतु त्यांचे मंत्री- आमदारांचे काय? ते स्वच्छ आहेत काय? अशी विचारणा ‘गोंयचो आवाज’ संघटनेने केली आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे निमंत्रक व्हेरीएटो फर्नांडिस आणि   स्वप्नेश शेर्लेकर यांनी सांगितले की, आमदार फुटतात, दुसऱया पक्षात जातात, निवडणुका घेऊन पुन्हा विजयी होतात. यात भ्रष्टाचार आहे. मग मुख्यमंत्र्यांना तो नाही असे म्हणायचे आहे काय? त्यांनी मंत्री, आमदारांना ‘क्लीन चीट’ देऊ नये सरकारी अधिकारी कर्मचारी यांना इशारा देण्याबरोबरच त्यांनी मंत्री- अमादारांनाही तसेच बचावण्याची गरज आहे, असे निमंत्रकांनी नमूद केले.

नोकऱयांबाबत कामगार मंत्री रोहन खंवटे हे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अनेक सरकारी अधिकारी- कर्मचारी हे विविध उद्योगात गुंतलेले आहेत असे खंवटे म्हणतात. खंवटे हे सुद्धा सरकारचा भाग असून ते सुद्धा अनेक उद्योगात आहेत त्यांना दुसऱयांकडे बोटे दाखवण्याचा अधिकार नाही. एक उपमुख्यमंत्री तर रियल इस्टेटमधील व्यापारी आहे. त्यांच्याकडे चक्क नगरनियोजन कृषी खाते देण्यात आले आणि आता वनखाते कृषी खाते देण्यात आले आणि आता वनखाते दिल्याने ती गोष्ट गोव्यासाठी मोठी आपत्ती असल्याचे मत संघटनेतर्फे प्रकट करण्यात आले आहे.

दुसरे उपमुख्यमंत्री मडगांवचे विपेते- व्यापारी यांचे संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी फक्त पक्षीय उडय़ा मारण्याचेच काम केले आहे. त्यांच्या मुलाचा उद्योग पर्यटनात बेकायदा ठरला असून त्याचे उद्घाटनही मुख्यमंत्री करतात. अशा या सर्वांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे काय? असा प्रश्न फर्नांडिस व शेर्लेकर यांनी उपस्थित केला आहे. हेच लोक इतरांना भ्रष्टाचाराबाबतचे सल्ले देतात- कारवाईची भाषा करतात. मुख्यमंत्र्यांना जर भ्रष्टाचाराची खरोखरच चिंता असेल तर त्यांनी मंत्री आमदार व त्यांच्या मुलांची चौकशी करावी, असेही ते म्हणाले.

Related posts: