|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » वर्ल्ड कप नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून ख्रिस गेल घेणार निवृत्ती

वर्ल्ड कप नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून ख्रिस गेल घेणार निवृत्ती 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. इंग्लंडविरूद्ध होणाऱया मालिकेआधी ख्रिस गेल ही घोषणा केली. 

वेस्ट इंडिज क्रिकेटने ट्विटरच्या माध्यमातून गेलच्या निवृत्तीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. 39 वर्षीय गेलने 284 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 37.12 च्या सरासरीने 9727 धवा केल्या आहे. यामध्ये 23 शतके आणि 49 अर्धशतके गेलच्या नावावर आहेत. त्याच्या नावावर 165 विकेट्स ही आहेत.

गेल ने 2015 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध सर्वाधिक 215 धवा केल्या होत्या. वर्ल्ड कपमधील ही पहिली द्विशतकी खेळी होती. कसोटीत त्रिशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी- 20 सामन्यात शतक झळकावणारा गेल हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे.

निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित कसोटी मालिका खेळेन. त्यानंतर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी नक्कीच खेळणार आहे. पण ट्वेन्टी- 20 मालिकेत मात्र मी खेळणार नाही.

 

Related posts: