|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » शेअरबाजाराचा शेवटच्या क्षणी ‘यु-टर्न’

शेअरबाजाराचा शेवटच्या क्षणी ‘यु-टर्न’ 

सेन्सेक्स 271 तर निफ्टीत 84 अंकांची दमदार तेजी

प्रतिनिधी/ मुंबई

मागील दोन दिवस सुरू असलेल्या शेअरबाजारातील तेजीने गुरुवारीही आपला धमाका कायम ठेवला. दिवसभर शेअरबाजारात तेजी-घसरण सुरूच होती. मात्र, शेवटच्या अर्ध्या तासात शेअरबाजाराने ‘यु टर्न’ घेतला. त्यामुळे दमदार तेजी झाली. सेन्सेक्स 300 अंक तर निफ्टीही 8700 च्या स्तरापर्यंत पोहचला.

शेअरबाजाराची चाल

गुरुवारी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात जबरदस्त उत्साह दिसून आला. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 1 टक्क्यांपेक्षा आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1.25 टक्क्यांनी तेजीत आले. शेअरबाजारातील तेजीमध्ये पॉवर, कॅपिटल गुड्स, फार्मा आणि ऑटो समभागांचे सर्वात मोठे योगदान राहिले. मात्र, एफएमसीजी समभागात विक्रीचा दबाव दिसून आला.

सेन्सेक्स-निफ्टीची चाल

दिवसअखेर बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 271 अंकांनी म्हणजे 1 टक्क्यांनी मजबूत होऊन 28,805 स्तरावर बंद झाला. तर एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 84 अंकांनी म्हणजे 1 टक्क्यांनी वाढून 8711.5 स्तरावर बंद झाला.

दिग्गज समभागांची स्थिती

दिवसभराच्या कारभारात दिग्गज समभागांमध्ये डॉ. रेड्डीज, बीएचईएल, झी एंटरटेनमेंट, सिप्ला, अंबुजा सिमेंट, गेल आणि एल अँड टी यांच्या समभागात 2.5 ते 5.7 टक्क्यांनी वधारले. तर जिंदाल स्टील, एशियन पेंट्स, पीएनबी, एचयूएल, बीपीसीएल, बजाज ऑटो, कोल इंडिया, भारती एअरटेल आणि आयटीसी यांच्या समभागात 0.5 ते 2.9 टक्क्यांची घसरण झाली.

मिडकॅप, स्मॉलकॅपची स्थिती

मिडकॅप समभागातील बीएफ यूटिलिटीज, त्रिवेणी टर्बाइन, इंडिया सिमेंट, एमआरएफ, सन फार्मा ऍडव्हान्स यांच्या समभागात 10 ते 12.4 टक्के वृद्धी झाली. तर स्मॉलकॅप समभागातील रिको इंडिया, एनडीटीव्ही, आयएलअँडएफएस इंजिनियरींग, क्लॅरिस लाइफ आणि नितिन फायर यांच्या समभागात 19.3 ते 20 टक्के तेजी झाली. 

Related posts: