|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » डेन्मार्कमध्ये प्रेडरिकेसन स्थापन करणार सरकार

डेन्मार्कमध्ये प्रेडरिकेसन स्थापन करणार सरकार 

वृत्तसंस्था/ कोपेनहेगन

 कित्येक आठवडय़ांपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर तीन डावे आणि डाव्या विचारसरणीच्या दिशेने झुकलेल्या पक्षांसोबत करार झाल्यावर डेन्मार्कच्या सोशल डेमोक्रेट नेत्या अल्पमतातील सरकार स्थापन करणार आहेत. मेट्टे प्रेडेरिकसेन (41 वर्षे) डेन्मार्कच्या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान ठरणार आहेत.

आता आम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचलो आहेत. डेन्मार्कवासीयांनी मत दिल्यास आम्ही बहुमताचे सरकार स्थापन करू शकतो हे दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. डेन्मार्कमध्ये सद्यस्थितीत अल्पमतातले सरकार सत्तेवर येणार आहे. हवामान बदल, आर्थिक आणि स्थलांतर धोरणावर परस्पर विरोधी मागण्यांवर राजकीय पक्षांमधील चर्चा केंद्रीत राहिली आहे. बुधवारी 18 पानी करार सादर करणार असून त्यातून गुरुवारी नव्या सरकारची रुपरेषा उघड होणार असल्याचे मेट्टे यांनी म्हटले आहे.

डेन्मार्कमध्ये 1988 नंतर सरकार स्थापनेसाठी पहिल्यांदाच 3 आठवडय़ांपर्यंत चर्चा चालली आहे. हरित लक्ष्यांना प्राधान्य देणारा हा जगाचा पहिला राजकीय दस्तऐवज आहे. मतदार आणि डाव्या पक्षांमधील हा एक महत्त्वाचा मुद्दा होता असे त्या म्हणाल्या.

हवामान योजना तसेच संबंधित अनिवार्य कायदा आम्ही तयार करणार आहोत. हरितवायूंचे उत्सर्जन 70 टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य बाळगल्याचे मेट्टे म्हणाल्या. विरोधी सोशल डेमोक्रेट्सनी 25.9 टक्के मतांसह 5 जून रोजी सार्वत्रिक निवडणुकीत विजय प्राप्त केला होता. निवडणुकीत अनेक महत्त्वपूर्ण सहकाऱयांच्या पराभवामुळे विद्यमान लिबरल पंतप्रधान लार्स लोके रासमुसेन यांचे सरकार संपुष्टात आले होते.