|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » नीरव मोदीची स्विस बँकेतील चार खाती गोठवली

नीरव मोदीची स्विस बँकेतील चार खाती गोठवली 

 

ऑनलाईन टीम  / नवी दिल्ली : 

पंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा करून पळून गेलेले हिऱयाचे व्यापारी नीरव मोदी याला जबरदस्त धक्का बसला आहे. नीरव मोदीची स्विस बँकेतील चार खाती गोठविण्यात आली आहे. त्याच्या या खात्यांमध्ये साठ लाख डॉलर्सची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.

पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करून मोदी भारताबाहेर पसार झाला आहे. त्याने मामा मेहुल चोक्सीच्या साथीने हा महाघोटाळा केला होता. याप्रकरणी सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू असून मोदी व चोक्सीची 4 हजार 765 कोटींची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोदीची पत्नी अमी हिच्याविरुद्ध ही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे.

पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून फरार झालेला नीरव मोदी सध्या लंडनच्या वडस्वर्थ कारागृहात आहे. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे यासाठी त्याने तेथील न्यायालयात चार वेळा याचिका दाखल केल्या आहे. त्याच्या सगळय़ा याचिका आतातपर्यंत न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

 

Related posts: