|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये धोकादायक वाडा कोसळून तीन जखमी

नाशिकमध्ये धोकादायक वाडा कोसळून तीन जखमी 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिक गावठाणात एक धोकादायक वाडा कोसळल्याने तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

कालपासूनच नाशिक शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळेच मोडकळीस आलेला जुने नाशिक भागातील गावठाण भागातील संभाजी चौक परिसरातील काकडे वाडा सकाळी कोसळला. या दुर्घटनेत त्यात चार जण अडकले होते. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि चौघांची सुटका केली. त्यातील तीन किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related posts: