|Monday, February 24, 2020
You are here: Home » leadingnews » पुण्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू

पुण्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्याच्या कोंढवा परिसरात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना जीवंत बाहेर काढण्यात आले आहे. काल मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत मजूर मुळचे हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात अल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षण भिंत पावसामुळे कोसळल्याने ही दुर्घटना घडली. आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला इमारतीचे काम सुरू होते. इमारतीचा पाया बांधण्यासाठी 40 ते 50 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या कच्च्या झोपडय़ा या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे सोसायटीच्या पार्किंगची संरक्षण भिंत खचून ही दुर्घटना घडली. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे बचावकार्याला वेग आला आहे.

Related posts: