|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » पेहलू खान यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

पेहलू खान यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल 

ऑनलाइन टीम / जयपूर :

जमावाने अत्यंत निर्दयीपणे ठेचून मारलेल्या व्यक्तीविरोधत राजस्थान पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. राजस्थानमध्ये पेहलू खान यांना गाय तस्करीच्या आरोपावरून अलवरमध्ये ठेचून मारले होते. पोलिसांनी पेहलूसह त्याच्या मुलांविरोधत आरोपपत्र दाखल केले.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पेहलू खानची मुले इर्शाद (25) आणि अरिफ (22) यांचा समावेश आहे. डेअरी व्यवसायिक असलेला पेहलू 2017 मध्ये गायींच्या खरेदीसाठी हरियाणाला जात होता. त्यावेळी जमावाकडून हल्ला करण्यात आला होता. जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत दोन दिवसांनी पेहलूचा मृत्यू झाला होता.

पेहलूविरोधत गेल्यावषी डिसेंबर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. राजस्थानमध्ये गेहलोत सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. भाजप सरकारच्या कार्यकाळात केलेल्या चौकशीच्या आधरावरच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्षष्ट केले.

राजस्थान पोलिसांन पेहलूला ठेचून मारल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. तर पेहलू आणि त्याच्या कुटुबियांविरोधत गायींची अवैधरित्या वाहतुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सामूहिक हत्या प्रकरणातील सहा जणांना क्लिन चिट दिली होती.

 

Related posts: