|Friday, December 6, 2019
You are here: Home » मनोरंजन » बिग बॉस : पराग कान्हेरेची रवानगी सिपेट रूममध्ये

बिग बॉस : पराग कान्हेरेची रवानगी सिपेट रूममध्ये 

 

ऑनलाइन टीम  /मुंबई  : 

रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी सीझन 2’ सध्या खूप चर्चेत आहे. एका महिन्यात बिग बॉसच्या घरात बऱयाच घडामोडी घडताना पहायला मिळाल्या. शिवानी सुर्वे हिने तब्येतीमुळे हा शो सोडला तर अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली. तर आता पराग कान्हेरे यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र नुकत्याच प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये परागला बिग बॉसच्या घरातून सस्पेंड करण्यात आल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे तो या शोमधून बाहेर पडला नसल्याचं निश्चित झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परागला सिपेट रुममध्ये पाठवण्यात आलं आहे. सिपेट रुममधून तो बिग बॉसच्या घरात काय चाललं आहे हे टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकणार आहे. मात्र तो सिपेट रुममध्ये किती दिवस राहणार, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

 

Related posts: