|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इराणी कच्चे तेल खरेदी केल्यास निर्बंध

इराणी कच्चे तेल खरेदी केल्यास निर्बंध 

अमेरिकेच्या विशेष राजदूताचा इशारा

वृत्तसंस्था/ इराण

इराणमधील अमेरिकेचे विशेष राजदूत ब्रायन हुक यांनी इराणकडून कच्चे तेल विकत घेणाऱया देशावर निर्बंध लादणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या याप्रकरणी कुठल्याच देशाला सूट देणार नाही. आशियाई देशांनाही याप्रकरणी सूट मिळणार नसल्याचे हुक यांनी म्हटले आहे.

इराणकडून मोठय़ा प्रमाणात कच्चे तेल आयात करणाऱया देशांमध्ये चीन आघाडीवर असल्याचे हुक यांनी स्पष्ट केले आहे. 2015 च्या आण्विक करारात इराण सामील रहावा, याकरता युरोपीय महासंघ सातत्याने प्रयत्नशील आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जगभरातील देशांनी इराणकडून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे.

इराणचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनने मे महिन्यात 3,86,021 बॅरल्स प्रतिदिन आयात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 63.1 टक्क्यांनी कमी झाले आहे. भारताची इराणकडून होणारी तेल  आयात 81.3 टक्क्यांनी कमी होत 1,32,000 बॅरल्स प्रतिदिनावर आली आहे.

Related posts: