|Thursday, January 23, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 30 जून ते 6 जुलै 2019

मेष

चंद्र, नेपच्यून त्रिकोण योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या कामात यश देणारा ठरू शकतो. संघर्ष संपलेला नाही तरीही प्रयत्नाने पुढे जाता येईल. धंद्यात कामे येतील. गोड बोलून नोकरांच्याकडून काम करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात, दौऱयात यश मिळेल. लोकांचे प्रेम मिळवा. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. प्रगती होईल. कोर्टकेस जिंकता येईल. घरगुती समस्या कमी होईल. शेतकऱयाला दिलासा मिळेल.


वृषभ

चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. महत्त्वाची कामे करा. धंद्यात वाढ होईल. फायदा मिळेल. थकबाकी मिळवा. शेतकरी वर्गाला लवकर येणारे पीक फायदेशीर ठरेल. योग्य मार्ग मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकप्रियता टिकवता येईल. पुढच्या यशासाठी उत्तम काम करा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध व्हाल. पैसा मिळेल. शेअर्स अंदाज बरोबर येईल.


मिथुन

चंद्र, नेपच्यून त्रिकोण योग, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. शेतकरी वर्गाचा अंदाज घेता येईल. मोठे धाडस आता नको. राजकीय, सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. पुढील निवडणुकीसाठी कार्य करा. यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. घर, जमीन खरेदी करता येईल. मुलांची उन्नती होईल. नोकरी टिकेल.


कर्क

चंद्र, बुध युती, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात काम मिळेल. फायदा होईल. गिऱहाईक, कामगार यांच्याशी गोड बोला. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न मंगळवार, बुधवार होऊ शकतो. नोकरीत सावधपणे काम करा. चूक होऊ शकते. घरगुती कामे रेंगाळण्याची शक्मयता. जवळच्या माणसांना दुखवू नका. कला, क्रीडा क्षेत्रात तणाव संभवतो. वृद्धांची चिंता राहील.


सिंह

चंद्र, नेपच्यून त्रिकोण योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात समस्या येईल. गुरुवार, शुक्रवार वाद वाढू शकतो. प्रवासात घाई करू नका. रागावर ताबा ठेवा. ऑपरेशनची शक्मयता आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. जनहितासाठी चांगली योजना बनवा. कार्य करा. कला,क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कौतुक होईल. घर खरेदीचा विचार कराल.


कन्या

चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. महत्त्वाचा निर्णय  धंद्यात, नोकरीत घेता येईल. नवे काम मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. प्रजेसाठी चांगले कार्य करा. कला,क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळखी होतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कोर्टकेस  संपवा. घरातील व्यक्ती  तुम्हाला साथ देतील.


तुळ

चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. जम बसेल. शेतकरी वर्गाला नुकसान भरून काढण्याची संधी मिळेल. नवा नैसर्गिक शेती प्रयोग करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव दिसेल. वरि÷ कौतुक करतील. नोकरी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्टकेस संपवा.


वृश्चिक

चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. मोठे कंत्राट मिळेल. मित्रांच्या भरवशावर राहू नका. शेतकरी वर्गाचा थोडा अंदाज या सप्ताहात चुकण्याची शक्मयता आहे तरी या वर्षात चांगले धान्य होईल. राजकीय, सामाजिक कार्यात इतरांचे विचार ऐकावे लागतील. आरोप सहन करावा लागेल. घरगुती समस्या येईल. संयम ठेवा. स्पर्धा कठीण आहे.


धनु

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाद जास्त होऊ शकतो. शेतकरी वर्गाला प्रसंगावधान ठेवावे लागेल. या सहामाही  पिकात  अडचणी येतील. कामगारांना सांभाळून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. लोकांचा, वरि÷ांचा पाठिंबा मिळेल. लोकांच्यासाठी काम करा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख वाढेल. प्रवासात घाई नको. व्यवहारात सावध रहा.


मकर

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. अरेरावी कुठेही करू नका. शेतकरी वर्गाला सावधपणे निर्णय घ्यावा लागेल. धंदा मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. वरि÷ांची नाराजी मंगळवार, बुधवार होऊ  शकते. खर्च वाढेल. प्रेमात तणाव होईल. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे ठरेल.


कुंभ

चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. गुरुवार, शुक्रवार धंद्यात तणाव मतभेद होईल. नोकरांच्याकडून त्रास होईल. बोलणे कठोर वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. महत्त्वाची योजना मार्गी लावा. वेळेला महत्त्व द्या. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ होईल. घरातील व्यक्ती आनंद देतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शेतकरी वर्गाला फायदा होईल.


मीन

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, शुक्र युती होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला यश देणारा ठरेल. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. नवीन ओळख होईल. राजकीय, सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. योजना मार्गी लावता येतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. प्रेरणादायी घटना घडेल. शेतकरी उत्साहाने काम करू शकेल.


 

Related posts: