|Sunday, October 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » किरण ढाणे ‘पळशीच्या पीटी’च्या भूमिकेत

किरण ढाणे ‘पळशीच्या पीटी’च्या भूमिकेत 

जयडी’च्या भूमिकेने घराघरात पोहचलेली ‘राजकन्या’ म्हणजेच किरण ढाणेने स्वत:चे असे वेगळे स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्माण केलेय. ‘लागीरं झालं जी’ मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी किरण सध्या ‘राजकन्या’ या मालिकेतून आपल्याला रोजच भेटते. आत्ता लवकरच ती रुपेरी पडद्यावर एंट्री घेणार आहे. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित तसेच ‘कान्स चित्रपट महोत्सवा’मध्ये राज्य सरकारद्वारे निवडण्यात आलेली ‘पळशीची पीटी’ या आगामी मराठी चित्रपटातून किरण एका ध्येयवेडय़ा ऍथेलिट्सच्या भूमिकेत दिसणार आहे. ग्रीन ट्री प्रॉडक्शन प्रस्तूत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य अधोरेखित करतो. ‘पळशीची पीटी’ने आजपर्यंत अनेक दिग्गजांची मने जिंकली असून आता रसिक-मायबापांच्या पसंतीची पोचपावती मिळवण्यास सज्ज झाले आहेत.