|Sunday, October 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » सारे जहाँ में अलगसा छाया है!

सारे जहाँ में अलगसा छाया है! 

आपल्या आवाजाच्या जादूने अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गुणी व सुफी गायक म्हणून सर्वश्रुत असणारा जावेद अली म्हणतोय, ‘सारे जहाँ में अलगसा छाया है!’ कारण त्याच्या आगामी चित्रपटाच्या गीताचे हे बोल आहेत. त्याचा ‘पुणे टू गोवा’ हा आगामी चित्रपट असून यामध्ये त्याने हे एक गाणे गायले असून हे जर्नी गीत आहे. नुकतेच त्याने हे गाणे रेकॉर्ड केले. आजवर मी अनेक गीते गायली मात्र हे जर्नी गीत गाताना मला खूप मज्जा आली. हे गीत प्रत्येकाला नक्की आवडेल, असे जावेद अली म्हणाले.

रोहन नाईक, मुंबई