|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » पुणे पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीसपदी हंचाटे

पुणे पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीसपदी हंचाटे 

उपाध्यक्षपदी ‘तरुण भारत’चे सुकृत मोकाशी

पुणे / प्रतिनिधी :

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी प्रसाद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदी ‘सीएनएन न्यूज 18’चे चंद्रकांत हंचाटे व उपाध्यक्षपदी ‘तरुण भारत’चे पुणे प्रतिनिधी सुकृत मोकाशी निवडून आले आहेत.

पत्रकार संघाची वार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. त्यानंतर सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी महाराष्ट्र टाईम्सचे अभिजीत बारभाई यांचीही निवड झाली असून, खजिनदारपदावर पुढारीचे सुनील जगताप हे निवडून आले आहेत. त्याचबरोबर चिटणीसपदी सुराज्यचे विजय मस्के व लोकमतचे लक्ष्मण मोरे बिनविरोध निवडून आहेत. मावळते अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी कुलकर्णी यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली.

कार्यकारिणी सदस्य ः राजा गायकवाड, कुलदीप जाधव (महाराष्ट्र टाईम्स), संदीप पाटील, प्रशांत बिडवे, शिरीष रणदिवे (पुण्यनगरी), संदीप मराठे (सामना) तनिष्का डोंगरे (पुढारी), अमोल कविटकर (साम टिव्ही), विजय कुलकर्णी (प्रभात), अभिजित पिसे (टिव्ही 9)