|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 6 महिन्यात अमेरिका-मेक्सिको सीमेवर 170 मृत्यू

6 महिन्यात अमेरिका-मेक्सिको सीमेवर 170 मृत्यू 

जीव धोक्यात घालत आहेत शरणार्थी :

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

सुखी जीवनाच्या शोधात मेक्सिकोतून अमेरिकेत जात असलेल्या ऑस्कर अल्बर्टो मार्टिनेज रामिरेज स्वतःची कन्या वालेरियासोबत रियो ग्रँड नदी ओलांडताना बुडाले. अल्बर्टो 23 महिन्याच्या कन्येला स्वतःच्या टी-शर्टमध्ये अडकवून नदी ओलांडत होते. अल्बर्टो आणि वालेरियाचे नदीकाठावरचे मृतदेह पाहून जग हेलावून गेले. यंदा 27 जूनपर्यंत 1224 शरणार्थींचा मृत्यू झाला असुन यातील 14 टक्के म्हणजेच 170 जण अमेरिका-मेक्सिको सीमेवर मारले गेले आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशननुसार जानेवारी 2014 पासून 27 जून 209 पर्यंत 32182 शरणार्थींचा मृत्यू झाला. तर याच कालावधीत अमेरिका-मेक्सिको सीमेवर 2075 जण मारले गेले.

मध्य अमेरिकन देशांमध्ये राहणारे लोक अमेरिकेत आश्रय मागतात, या देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेसह बेरोजगारी तसेच गरिबी यासारख्या समस्या वेगाने विक्राळ होत चालल्या आहेत. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरुवातीपासूनच शरणार्थींच्या विरोधात राहिले आहेत. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेचा शरणार्थी कायदा अत्यंत कठोर झाला आहे. शरणार्थींना या प्रक्रियेकरता कित्येक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. याच कारणामुळे शरणार्थी दुसऱया मागांने अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करतात आणि जीव गमावून बसतात.

अमेरिकेच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 92959 जणांनी आश्रयासाठी अर्ज केला होता. तर 2017 मध्ये 555584 जणांनी अर्ज केला होता. यंदा पहिल्या 4 महिन्यांमध्ये मेक्सिकोतून सुमारे 18 हजार जणांनी आश्रयाची मागणी केली आहे.

गरीबी, हिंसा अन् बेरोजगारी

गरीबी, हिंसा आणि बेरोजगारी या तीन मोठय़ा कारणांमुळे मध्य अमेरिकन देशांमधील लोक स्थलांतर करत आहेत. होंडुरास, ग्वाटेमाला आणि अल-साल्वाडोरमध्ये गरीबी, हिंसा आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. याचसारखी स्थिती मेक्सिकोमध्येही आहे. सुखी जीवनाच्या शोधात मेक्सिको आणि मध्य अमेरिकन देशांचे लोक दररोज अमेरिकेच्या सीमेत शिरण्याचा प्रयत्न करतात. एका अनुमानानुसार दरवर्षी सुमारे 5 लाख लोक मेक्सिकोमार्गे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. यंदाच्या 3 महिन्यांमध्येच 3 लाखांहून अधिक शरणार्थींनी अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला आहे.

मेक्सिकोही रोखतेय

मेक्सिकोने अवैध स्थलांतरितांना न रोखल्यास तेथून आयात होणाऱया सर्व सामग्रीवरील शुल्क वाढविले जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी मे महिन्यात दिली होती. या पार्श्वभूमीवर मेक्सिकोने बेलिज आणि ग्वाटेमाल सीमेवर 6 हजार सैनिक तैनात करण्याचा शब्द दिला. तसेच अमेरिकेसोबत मिळून प्रवासी सुरक्षा शिष्टाचाराचा विस्तार करण्यास सहमती दर्शविली आहे. या माध्यमातून शरणार्थींना मेक्सिकोतच राहण्याची जागा, शिक्षण आणि रोजगार देण्याचा मुद्दा सामील आहे. तसेच मेक्सिकोने उत्तर सीमेवर 15 हजार सैनिक तैनात केले आहेत.

दर महिन्याला 40 हजार ताब्यात

अमेरिकेच्या कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या आकडेवारीनुसार 2000 नंतर अमेरिकेच्या सीमेत शिरणाऱया शरणार्थींच्या संख्येत घट झाली आहे. 2000 मध्ये 16 लाखांहून अधिक जणांना सीमेत शिरकाव करताना पकडण्यात आले होते. तर 2018 मध्ये 4 लाख जणांना पकडण्यात आले. पण यंदा मे महिन्यापयंत अमेरिका-मेक्सिको सीमेवर 6 लाख लोकांना सीमा ओलांडताना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Related posts: